
चंद्रपूर | थर्मल पॉवर स्टेशन मध्ये कार्यरत श्री नंदेश्वर हे स्थापत्य विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत.युनीट क्र ८ व ९ ची निर्मिती सुरू असतांनाच नंदेश्वर यांनी रेल्वे साईडिंग कामामध्ये भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले होते . संबंधीत कामाची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.मात्र भ्रष्टाचाराला पांघरूण घालण्यासाठी कार्यकारी अभियंता यांनी ॲशबंड च्या कामासाठी नंदेश्वर यांची बढतीवर नियुक्ती करण्यात आली आहे.ॲशबंडच्या कामात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याची ओरड आहे.त्यामुळे नंदेश्वर यांच्या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. नंदेश्वर यांनी नोंदविलेल्या कामाच्या देयकांची सखोल चौकशी सी व्ही सी मार्फत करण्यात यावी , नंदेश्वर यांच्या आतापर्यंतच्या संपुर्ण मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्वराज्य रक्षक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कऱण्यात आली होती. मात्र मा.अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व मुख्य अभियंता यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.सदर प्रकरणाची तक्रार देऊन महिणा भराचा कालावधी लोटून सुद्धा अद्यापही चौकशी करण्यात आली नाही. मुख्य अभियंता या प्रकरणात मुग गिळून गप्प का असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे.