Friday, February 14, 2025
Homekorpanaजि.आर.आय.एल. कपंनीचे क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन !
spot_img
spot_img

जि.आर.आय.एल. कपंनीचे क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन !

कोरपना : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी या रस्ते विकास काम जोरात सुरू असून जी आर आय एल या कंपनीच्या माध्यमातून काम सुरू आहे. मात्र गेल्या तब्बल १७ महिन्यात कंपनीने खणीकर्म विभाग जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फतीने बारमाही वाहणारे नाले तसेच मामा तलाव व शासकीय जमिनीवरील उत्खननाचे परवानगी घेतल्याचे दाखवून जिल्हाधिकारी यांनी टाकून दिलेल्या अटी शर्ती तिलांजली देत या कंपनीने मंजूर क्षमतेपेक्षाही अधिक प्रमाणामध्ये दगड मुरूम रेती माती उत्खनन केली.  G.R.I.L. Excavation of companies more than capacity!  

जि.आर.आय.एल. कपंनीचे उत्खनन क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन !



याबाबतच्या कंपनीच्या मुजोरी व नियमबाह्य कामाबाबत तहसीलदार कोरपणा यांच्याकडे दोन वेळा कारवाई करून वाहन ताब्यात घेण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांनी रेती उत्खनन करू नये तसेच अटी व शर्तीचे पालन करावे असे नमूद करून उत्खनन आदेश दिले मात्र प्रत्यक्षात या कंपनीने अटी शर्ती भंग करून २४ तास उत्खनन करीत आहे. अटीमध्ये असलेल्या शर्ती मंजूर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन झाल्यास स्वामित्व धन जमा करण्याची तरतूद आहे. मात्र गेल्या दोन वर्षात या कंपनीने अतिरिक्त उत्खननाचा पैसा शासनाच्या तिजोरीमध्ये जमा केला नाही. मात्र काही लोकांचे खिसे गरम करून शासनाच्या स्वामित्वधनाला चुना लावल्या जात आहे. हेटी येथे तलाव निमणी येथे तलावनसताना शासनाच्या गायरान जमिनीवर मुरुमाचे उत्खनन करण्यात आले. सदर तक्रार होताच याठिकाणावरून उत्खनन बंद करून नाल्याकडे आपला ओढा कंपनीने नेला राज्यामध्ये रेती उत्खननाबाबत वेगळे नियम असून मुठरा नाल्यातील इमारतीला वापर योग्य अशा रीतीचा वापर हरदोना चंदनवाही पांढरपौणी या भागात मोठ्या प्रमाणात वापर झाला.


वनविभाग अनभिज्ञ !

प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे कंपनीने राजुरा, कोरपणा तालुक्यातील अनेक नाल्यातून मंजुरी पेक्षा चारपट अधिक मुरूम दगडाचा वापर केले आहे. पायाभूत सुविधा करून देण्याच्या नावावर नाल्याच्या गावाच्या लोकांना खोटे आश्वासने देऊन एकही काम न करता अविरत उत्खनन सुरू आहे याबाबतची चौकशी करून राष्ट्रीय संपत्तीची होणारी नुकसान जिल्हा प्रशासन थांबवणार का ? असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे. (ता. प्र.)

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Breaking News