पोंभूर्णा : चिचपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत सातारा तुकुम – दाबगाव जंगल परिसरातील सर्व्हे क्र. १३१ ते १४७ मद्ये वन विभागा अंतर्गत वृक्ष लागवड संगोपन करण्याकरिता त्याभोवती सरक्षण कुंपणाचा काम सुरू आहे. त्या बांधकामात कंत्राटदाराने जवळ असलेल्या वन विभागाच्या नाल्याची रेती उपसून तिथेच उपयोग केल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. चक्क त्या कंत्राटदाराची कमालच आहे शेकडो ब्रास रेती त्याने त्या नाल्यातून उपसा करून अवैधरित्या जमा करून ठेवली आहे. Forest department’s ‘meaningful neglect’ of sand mining
![]() |
संग्रहित |
हाके च्या अंतरावर केळझर येथे क्षेत्र सहाय्यक वन कार्यालय आहे याचं कार्यालयातून दाबगाव लगत सुरू असलेल्या संरक्षण कुंपणचे काम चालू आहे. या बाबत संबंधी अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती असूनही आजपर्यंत कोणत्याच प्रकारची कार्यवाही संबंधित कंत्राटदारावर करण्यात आली नाही, यावरून असे लक्षात येते की कंत्राटदार व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमतानेच लगतच्या नाल्यावरील रेती कुंपणाच्या कामत जोमात वापर सुरु असल्याचे दिसुन येत आहे. कुंपणच खातोय शेत. रक्षकच भक्षक बनले… तर अशा रेती चोरीवर आळा घालणार तरी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत दाबगाव, सातारा तुकुम जंगल परिसरातील वनरक्षक, अधिकाऱ्यांकडून कसल्याही प्रकारची कारवाई सोडा, साधी चौकशीही केली नाही. नाल्यामधून शेकडो ब्रास रेतीचा उपसा करण्यात आल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. या रेतीची तस्करांनी जंगलातील नाल्यालगत सरक्षन कुंपणाचे काम सुरू असून तेथे नाल्यातील रेतीचे ढीक उभे केले आहे. भर जंगलातून रस्ता तयार करून रेतीची अवैधपणे वाहतूक केली जात असताना या प्रकाराकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब आहे.