चंद्रपूर थर्मल पावर टेशन मधील अनेक तक्रारी मुंबई स्थित प्रकाशगड एमडी (MD) कार्यालयात प्रत्यक्ष व मेल द्वारे दिल्या जाते मात्र ते पत्र किंवा तक्रारी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे
चंद्रपूर : चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन हे वीज निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर यामुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते. चंद्रपूर थर्मल स्टेशन मध्ये होत असलेल्या कामांमध्ये अनेक गैरव्यवहार होते आशी नेहमी चर्चा असते, अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राट देणे, एकच काम दोनदा करणे जसे (स्थापत्य विभागाचे कार्यालय) या चर्चा व प्रसार माध्यमांमध्ये ऐकायला व वाचयला मिळते, थर्मल पावर स्टेशन मध्ये सुरू असलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे तक्रारी दिल्या जाते मात्र या तक्रारीवर कसल्याही प्रकारचे निराकरण केल्या जात नाही थातूरमातूर उत्तर दिले जाते.
गेल्या वर्षभरात अनेकांनी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधील स्थापत्य विभागाचे अनेक तक्रारी देण्यात आल्या आहे. उदाहरणार्थ ॲशबंड कडे जाणारे उडान पूल रस्ते अशा विविध कामांचा तक्रारी करण्यात आल्या मात्र त्या तक्रारी व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष संचालक यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या कार्यालयात उपस्थित असलेले तांत्रिक सल्लागार ”कुऱ्हाड” एमडी यांचे सहायक आहेत मागील एक ते दीड वर्षापासून चंद्रपूर स्थापत्य विभागाच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या मात्र त्या तक्रारी एमडी (MD) पर्यंत पोहोचले नसल्याचे दिसून आले आहे. स्थापत्य विभागाचे अधिकारी व ज्यांच्या विरोधात किंवा ज्यांच्या संबंधातील तक्रारी आहेत त्या तक्रारी एमडी कार्यालयात उपस्थित असलेले कुऱ्हाड हे अर्थपूर्ण सबंध जोपासत असल्यामुळे ते प्रकरणे एमडी पर्यंत न पोहोचवता परस्पर आपल्या टेबलाखालून फेकून देत असल्याचं दिसून येत आहे .सर्व प्रकरणाची योग्य चौकशी करून तक्रार दाखल झाल्यानंतर कुऱ्हाड हे अधिकाऱ्यांना फोन करून आपल्याबद्दल तक्रार आल्याची माहिती देऊन ती तक्रार अर्थपूर्ण संबंध जोपासतात व त्या तक्रारीची परस्पर विल्हेवाट लावत असल्याची गोपनीय खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. याबाबत अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अलबनगन यांना याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे दिसून येते चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन मधील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या विस्तारीकरण ॲशबंड कडे जाणारे रस्ते ॲशबंड कडे जाणाऱ्या उडान फुलांचे बांधकाम याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या मात्र त्याकडे मुख्य अभियंता व अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या अक्षम्य दुर्लक्ष असल्याने कंत्राटदारांचे मनोबल चांगलेच वाढले आहे या सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यापर्यंत रसद पोहोचत असल्याने तेरी भी चुप मेरी याप्रमाणे सर्व चूप बसलेले आहेत स्थापत्य विभागात एकाच समूहाचा भरणा करून असताना सुद्धा याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे म्हणजे हम करे सो कायदा असे निर्माण होतात त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज ऊर्जामंत्री ऊर्जा सचिव व अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांचे आहे