कुटुंबीयांचा आरोप : डॉक्टरविरूद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार
चंद्रपूर : दहा वर्षाच्या मुलाला सकाळी अचानक गळ्यात दुखायला लागले. उपचारासाठी त्याला प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या किलबिल हॉस्पीटलमध्ये भरती केले. परंतु, डॉक्टरांनी थातूरमातूर उपचार सुरू करून कुत्र्याला फिरवित असताना उपचारादरम्यान, श्रीपर्ण रवीकिरण मुरकुटे याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. त्यानंतर कुटुंबीयांनी डॉ. अभिलाषा गावतुरे Dr. Abhilasha Gavture यांच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रविकिरण मुरकुटे यांचा मामेभाऊ अजय अशोक अहिरकर यांनी पोलीस ठाण्यात ही तक्रार केली आहे. Chandrapur hospital
रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान, श्रीपर्णला गळा आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर अर्ध्या तासातच तातडीने त्याला बाल रोगतज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या हॉस्पीटल वॉर्डातील किलबिल हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. डॉ. गावतुरे यांनी काही किरकोळ उपचार केले. सलाईन लावली. काही वेळातच श्रीपर्णला खूप वेदना व्हायला लागल्या. त्यामुळे तो तडफडू लागला. तेव्हा कुटुंबियांनी तातडीने डॉक्टरला बोलवा असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितले. तेव्हा डॉ. गावतुरे हे त्यांच्या कुत्र्याला फिरवित होत्या. पेशन्ट नार्मल आहे. काळजी करू नका, असे म्हणून डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. काही वेळातच श्रीपर्णच्या शरीराच्या सर्व हालचाली बंद झाल्या. नातेवाईकांनी दुसर्या रुग्णालयात हलविण्याची विनंती केली. परंतु, रुग्णाला दुसरीकडे हलविण्याची आवश्यकता नाही, असे डॉ. गावतुरे सांगत होत्या. जवळपास सकाळी १०.०५ मिनिटांनी श्रीपर्णचे शरीर पुर्ण थंड आले. ही बाब रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना सांगून डॉक्टरला बोलाविण्याची विनंती केली, तेव्हा डॉ. गावतुरे आल्याचा आरोप तक्रारीतन करण्यात आला आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी रुग्णाला बघितल्यानंतर सर्व नातेवाईकांना रूमच्या बाहेर काढले. काही वेळानंतर, रुग्णाची स्थिती अत्यंत नाजूक आहे, त्याने श्वास घेणे बंद केले आहे. डॉ. अनुप वासाहे यांच्या रुग्णालयात पुढील उपचाराल हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलविल आहे, असे डॉ. गावतुरे यांनी सांगितल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. रुग्णाला नेमके काय झाले, याची कोणतीही माहिती न देता डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. काह वेळानंतर रुग्णवाहिका आली. श्रीपर्णला डॉ. वासाडे यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्याला थोडावेळ व्हेंटीलेटरव ठेवले. त्यानंतर काही वेळाने श्रीपर्णच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले श्रीपर्णचा मृत्यू डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या रुग्णालयातच त्यांच्या हलगर्जीपणामुळे झाला. त्यामुळे किलबिल रुग्णालयातील सर्व सीसीटीवी फुटेज ताब्यात घेवून डॉ अभिलाषा गावतुरे यांच्याविरूद्ध गुन्ह नोंदविण्यात यावा, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.
श्रीपर्ण मुरकुटे या बालकाला रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर लगेच त्याच्यावर आवश्यक उपचार सुरू करण्यात आले. त्याचे गळ्यातील दुखणे असह्य होते. त्यामुळे त्याची परिस्थिती नाजूकच होती. उपचारात कोणतीही कसर ठेवली नाही. रुग्ण दगावल्यानंतर बहुतेक नातेवाईक डॉक्टरांनाच दोष देता हे योग्य नाही.
– डॉ. अभिलाषा गावतुरे
श्रीपर्ण मुरकुटे या दहा वर्षीय बालकाचा मृत्यू डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची तक्रार आली आहे. डॉ. गावतुरे यांनी रुग्णावर कोणकोणते उपचार केले, हे शवविच्छेदन अहवालातून समजून येईल. तसेच शासकीय मेडिकल कॉलेजच्या मेडिकल बोर्डाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानंतरच कारवाई करण्यात येईल.
– प्रभावती एकुरके ठाणेदार, चंद्रपूर शहर पोलीस ठाणे