Wednesday, March 19, 2025
Homeचंद्रपूरचंद्रपूरमध्ये तुफान राडा, धानोरकरांच्या भावाची अधिकाऱ्याला मारहाण
spot_img
spot_img

चंद्रपूरमध्ये तुफान राडा, धानोरकरांच्या भावाची अधिकाऱ्याला मारहाण

#pratibhadhanorkar #chandrapurloksabha #latestnews

खासदार बहिणीसमोरचं भावाचा राडा, कोळसा खाण अधिकाऱ्यांना शिवीगाळ

चंद्रपूर | चंद्रपूरमध्ये राडा झाल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकरांच्या समोरच त्यांच्या भावाने आणि कार्यकर्त्यांनी भद्रावती येथील कर्नाटक एमटा  खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. तसेच मारहाण केल्याचा गंभीर प्रकारही घडला आहे. विशेष म्हणजे शिवीगाळ करण्यात खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे आघाडीवर होते. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर घडला

भद्रावती स्थीत कर्नाटक एम्प्टा हि खदान नेहमी ह्या-ना त्या कारणाने चर्चेत असते. शासनाचे कायदे पायदळी तुडवू पाहणाऱ्या कर्नाटक एम्टा खदानीच्या विरोधात प्रकल्प ग्रस्तांच्या न्याय मागण्यांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलन करुन कोळसा खान बंद केली.

कर्नाटक एम्टा हि कोळसा खान काही वर्श बंद असल्यानंतर नव्या दमाने सुरु झाली. त्या ठिकाणी अनेक प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यांसाठी अनेक आंदोलने झाली. परंतु कर्नाटक एम्टा मुजोरी धोरणामुळे प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न मागे पडत राहिले. सदर कंपनी आज घडीला शासनालाही जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी या विरोधात आंदोलने केली. परंतु तेथील अधिकारी वेळ काढत प्रकल्पग्रस्तांची दिशाभुल करीत असतात. दि. 19 जुन रोजी सकाळी 10.00 वा. शेतकऱ्याच्या न्याय मागण्यांसाठी कर्नाटक एम्टा च्या विरोधात प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.

यावेळी अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या आंदोलनात सहभाग होता. यावेळी चर्चेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासंदर्भात माहिती नसल्याने अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांना चिड आली व आमच्या न्याय मागण्यासंदर्भात आपण पळ वाट शोधत असल्याची भावना शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. यावेळी अधिकाऱ्यांच्या या दुटप्पी भुमीकेमुळे प्रकल्पग्रस्तांसोबत धक्काबुक्की देखील झाली. या आंदोलनासंदर्भात खा. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या कि, या कंपनी संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या संदर्भात प्रसासनाकडे अनेकदा बैठकींचे आयोजन करण्यात आले परंतु कंपनी चे अधिकारी हे मुजोरीची भाषा करून शेतकरी व प्रकल्पग्रस्तांची अवहेलना करीत होते. या संदर्भात आज आंदोलन करीत अधिकार्यांना न्याय मागण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु शेतकऱ्यांना न्याय न देता अवहेलना करीत असल्याने आजचे आंदोलन चिघळले. भविष्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास या पेक्षा उग्र आंदोलन करणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी म्हटले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकरांसह वन प्रशासन अधिकारी श्री. खाडे व कर्नाटक एम्टाचे अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची उपस्थिती होती.

#pratibhadhanorkar #chandrapurloksabha #latestnews 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Breaking News