Monday, April 28, 2025
HomeUncategorizedजलद गतीने स्वछता मोहीम राबवा - राहुल पावडे Run Swachha campai
spot_img
spot_img

जलद गतीने स्वछता मोहीम राबवा – राहुल पावडे Run Swachha campai

जलद गतीने स्वछता मोहीम राबवा - राहुल पावडे

महानगर भाजपाचे आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर : भाजपाच्या सर्व माजी नगरसेवक व नगरसेविका यांना वारंवार स्वच्छतेच्या बाबतीत प्रभागातील तक्रारी प्राप्त होत आहेत.ही बाब आरोग्यासाठी अपायकारक आहे.म्हणून,महानगरातील विविध प्रभागात पावसा आधी जलदगतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी,महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व भाजपा माजी नगरसेवक व नगरसेविका शिष्ठमंडळाने यांनी आयक्तांकडे केली आहे.यावेळी माजी नगरसेविका शीला चव्हाण,छबु वैरागडे,राहुल घोटेकर,वंदना तिखे,अजय सरकार,वनिता डुकरे,शीतल आत्राम,राजेंद्र खांडेकर,सचिन कोतपल्लीवार यांची उपस्थिती होती.

पावडे म्हणाले,पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी सारख्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत होण्यापासुन बचावाकरीता महानगरात साफ सफाई होणे गरजेचे आहे. तसेच पावसाळ्यात साथीच्या रोगांनी मोठ्या प्रमाणात यापूर्वी अनेकदा थैमान घातले आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणुन मनपा क्षेत्रात स्वच्छता व डासांच्या बंदोबस्ताकरीता किटकनाशक फवारणी व नागरीकांच्या आरोग्य तथा अन्य सुविधांसाठी आपल्या स्तरावरून विविध उपाययोजना करावयाची आवश्यकता आहे. तेव्हा वेळे आधी शहरात बऱ्याच ठिकाणी छोट्या नाल्यांची साफ सफाई झालेली नाही. अशा तक्रारी सुध्दा प्राप्त होत आहे. सध्याच्या तुलनेत सफाईच्या बाबतीत यंत्रणेने कार्य करण्याकरिता सफाई कामगार वाढवण्याचे नितांत गरज आहे, त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत सफाई कामगार वाढवून नाल्यांची तातडीने सफाई करणे मोठ्या नाल्यावर सुद्धा सफाई कामगार वाढविले पाहिजे त्या ठिकाणी सफाई कामगाराच्या माध्यमातून साफसफाई करणे याकडे सुद्धा मनपा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अशा सूचना पावडे यांनी केल्या. भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने केलेल्या तक्रारी व सूचना लक्षात घेत , यावर योग्य त्या उपाय योजना करू असे आयुक्तांनी भारतीय जनता पार्टी माजी नगरसेवक व नगरसेविकांच्या शिष्टमंडळांला दिले.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Breaking News