भद्रावती : शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या अन्नदाता एकता मंचच्या वतीने या संघटनेचे मुख्य मार्गदर्शक डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या मार्गदर्शनात शेतपिकांच्या नुकसान भरपाईपोटी पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना उचित रक्कम द्यावी, अशी मागणी केली होती. डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या मार्गदर्शनात ह्या मागणीचा शासन व प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. या मागणीला अलिकडेच यश मिळाले असून शेतकऱ्यांच्या बँकखात्यात पिकविमा नुकसान भरपाई जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली. मात्र शेत पिकांचे नुकसान होऊन सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधीत पिक विमा कंपनी शेत पिकांची नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत होती. या परिस्थितीत अन्नदाता एकता मंचचे मार्गदर्शक डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांच्या बँकखात्यात पिकविमा नुकसान भरपाई जमा करण्यास सुरुवात मंचचे अध्यक्ष संदिप कुटेमाटे, संस्थापक अनुप कुटेमाटे, मोहन दर्वे, प्रदीप डोंगे, प्रवीण आवारी, विनोद ठोंबरे, सुनील मोरे, अमोल क्षिरसागर आणि असंख्य शेतकऱ्यांनी संबंधीत सर्वच विभागाला निवेदन दिले. त्यानंतर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली. नुकसान भरपाईची रक्कम पिकांच्या नुकसानी पेक्षा फारच कमी असल्यामुळे पुरेशी नुकसान भरपाई मिळावी. या मागणीचा पुन्हा पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर सुद्धा संबंधीत विमा कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच अन्नदाता एकता मंचचे संस्थापक अनुप कुटेमाटे यांनी या मागणी संदर्भात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच ट्विट केले.