चंद्रपूर || शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रनिहाय दोन विधानसभा क्षेत्राकरिता एक जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे वरोरा आणि चंद्रपूर विधानसभा, संदीप गि-हे बल्लारपूर आणि राजुरा विधानसभा तर मुकेश जिवतोडे चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात अगोदरच सहा विधानसभा क्षेत्रात पक्षप्रमुखांनी दोन जिल्हा प्रमुख असताना उपजिल्हा प्रमुख असलेले रवींद्र शिंदे यांच्या रूपाने तिसरा जिल्हा प्रमुख देऊन विद्यमान जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे व मुकेश यांचे कार्यक्षेत्र बदलल्याने शिवसेना उबाठा मध्ये मोठा राजकीय भूकंप झाले असून पक्ष प्रमुखांच्या या निर्णयाविरोधात मातोश्री समोर दोन्ही जिल्हा प्रमुखांसह जिल्ह्यातील जवळपास तीनशे नाराज शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करणार असून वेळ पडल्यास राजीनामा देणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. शिवसेना उबाठामध्ये विधानसभा निहाय विचार केला तर संदीप गिऱ्हे यांच्याकडे चंद्रपूर बल्लारपूर व राजुरा हें विधानसभा क्षेत्र होते तर मुकेश जीवतोडे यांच्याकडे वरोरा चिमूर आणि ब्रम्हपुरी हें विधानसभा क्षेत्र होते. संदीप गिऱ्हे यांना बल्लारपूर विधानसभा निवडणूक लढायची आहे आणि तशी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच ते चंद्रपूर येथील निवासी असून त्यांचे कार्यालय चंद्रपुरात असतांना त्यांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून बाहेर केल्याने त्यांच्यासह त्यांच्या समर्थक शिवसैनिकामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मुकेश जिवतोडे यांना वरोरा विधानसभा क्षेत्र सोडावे लागतं असल्याने त्याच्यासाह त्यांचे समर्थक शिवसैनिक कामालीचे नाराज आहे.
अगोदरच शिवसेना (उबाठा) मध्ये कार्यकर्त्याची उणीव असताना आता दोन्ही जिल्हा प्रमुखांनी एक एक कार्यकर्ते जोडत असताना आता नवीन जिल्हा प्रमुखाची नियुक्ती केल्याने कार्यकर्ते नाराज झाले असून पदाधिकारी कार्यकर्ते मुंबई ला रवाना झाले असून तिथे शक्ती प्रदर्शन करणार आहेत तसेच वेळ पडल्यास राजीनामा देण्याची भाषा बोलून दाखवली