चंद्रपूर दि. २६ (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यात खालीलप्रमाणे विधानसभा क्षेत्रनिहाय दोन विधानसभा क्षेत्राकरिता एक जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे-वरोरा आणि चंद्रपूर विधानसभा, संदीप गि-हे-बल्लारपूर आणि राजुरा विधानसभा तर मुकेश जिवतोडे-चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.