Friday, February 14, 2025
HomeChandrapurआनंदवनातील विवाहितेच्या हत्या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
spot_img
spot_img

आनंदवनातील विवाहितेच्या हत्या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

  चंद्रपूर || जिल्ह्यातील आनंदवन सेवा प्रकल्पात ४ दिवसांपूर्वी झालेल्या विवाहितेच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव समाधान माळी असे आहे 

A sensational incident has come to light that the accused committed suicide in the police custody in the case of the murder of a married woman which happened 4 days ago in the Anandvan Seva Project of Chandrapur district. The name of the accused who committed suicide is


वरोरा येथील बाबा आमटे यांच्या कर्मभूमीत २६ जूनला आरती दिगंबर चंद्रवंशी (वय २५) या विवाहितेची हत्या करण्यात आली होती. (Chandrapur) हिंगणघाट येथील सासर सोडून आरती काही महिन्यांपासून आपल्या आई- वडिलांसोबत वास्तव्याला होती. आरोपी समाधान माळी हा कुष्ठरोगी असल्याने तो एक वर्षाआधी आनंदवनात उपचाराला आला होता. तिथेच त्याचा परिचय आरतीशी झाला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र त्याने आरतीची हत्या केली होती. आरतीच्या हत्येमागे लव्ह – ब्रेकअप – मर्डर असे वळण असल्याचे पोलिस (Police) तपासात समोर आले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित आरोपी समाधान माळी याला चोवीस तासात अटक केली. 


या प्रकरणातील आरोपी समाधानला पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, आरोपीने रात्री पोलीस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केली. बुटाच्या लेसचा आत्महत्येसाठी वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहीती पुढे येत आहे. घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Breaking News