चंद्रपूर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नुकतेच बदल करण्यात आले होते. सहा विधानसभेसाठी तीन जिल्हाप्रमुख सामना या वृत्तपत्रामधून नियुक्ती करण्यात आली होती. चंद्रपूर वरोरा भद्रावती या विधानसभा रवी शिंदे यांच्याकडे देण्यात आले होते तर बल्लारशा राजुरा हे दोन विधानसभा संदीप गिऱ्हे यांचा कळे देण्यात आल्या होत्या भद्रावती वरोरा विधानसभा निवडणूक लढू इच्छित असलेले मुकेश जीवतोडे यांच्याकडे चिमूर ब्रह्मपुरी या दोन विधानसभा देण्यात आल्या होत्या. संदीप गिरे यांच्याकडून चंद्रपूर विधानसभा काढून घेण्यात आली होती तर मुकेश जीवतोडे यांच्याकडून वरोरा भद्रावती हे विधानसभा क्षेत्र काढून घेण्यात आले होते त्यानंतर दोन्ही जिल्हाप्रमुख व त्यांच्या समर्थकांनी मुंबई गाटली संपर्क प्रमुख व विदर्भ अध्यक्षांना न विचारता या नियुक्ती केल्या कशा असा प्रश्न विचारात पक्षप्रमुखांचा समोर शक्तिप्रदर्शन केले.
आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.जिल्हाप्रमुख पुढीलप्रमाणे – संदीप गिऱहे (बल्लारपूर विधानसभा, चंद्रपूर विधानसभा), रवींद्र शिंदे (भद्रावती – वरोरा आणि राजूरा विधानसभा), मुकेश जीवतोडे (ब्रह्मपुरी विधानसभा आणि चिमूर विधानसभा तसेच भद्रावती वरोरा विधानसभाप्रमुख).