Friday, February 14, 2025
spot_img
spot_img

चंद्रपूरमधील ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये गैरव्यवहार: 24 कॅरेट सांगून कमी शुद्धतेचं सोनं विकलं जातं, जीएसटीमध्येही घोळ

चंद्रपूर : शहरातील सोन्याच्या दुकानांमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहारांची गंभीर माहिती समोर आली आहे. अनेक ग्राहकांनी सांगितलं आहे की, 24 कॅरेट सोनं विकल्याचे सांगून प्रत्यक्षात कमी शुद्धतेचं सोनं दिलं जातंय. यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आर्थिक फटका बसत असून, सोन्याच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या प्रकारामुळे खरेदीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, प्रामाणिकपणे व्यवहार करणाऱ्या सोनारांवरही याचा परिणाम होत आहे.
विशेष म्हणजे, या सोन्याच्या दुकानांमध्ये जीएसटी बिलांमध्ये देखील मोठा घोळ होत आहे. अनेक ग्राहकांना योग्य जीएसटी बिले दिली जात नाहीत किंवा त्यांची डुप्लिकेट बिले बनवून फसवणूक केली जात आहे. यामुळे शासनाचा जीएसटी कर बुडवून काही व्यापाऱ्यांनी सरकारी तिजोरीत जाणाऱ्या करोडो रुपयांच्या महसुलाचं नुकसान केलं आहे. या जीएसटी फसवणुकीमुळे केवळ ग्राहकांचंच नुकसान होत नाही, तर शासनालाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. 
तक्रारीनुसार, अनुपम बहुउद्देशीय संस्थेने या गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल करत संबंधित दुकानदारांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. संस्थेचे प्रतिनिधी म्हणतात, “चंद्रपूरमधील अनेक सोनारांनी ग्राहकांची फसवणूक केली असून, जीएसटी फसवणूक ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने या प्रकरणांची तात्काळ दखल घ्यावी आणि दोषी ज्वेलर्सच्या दुकानांवर धाड टाकून कठोर कारवाई करावी.”
सूत्रांच्या माहितीनुसार, पैशांचा हवाला सोन्याच्या व्यवहारातून होत असल्याचे देखील आढळून आले आहे. काही दुकानांमधून काळ्या पैशांचा व्यवहार होत असून, या पैशांचा वापर इतर गैरकायदेशीर व्यवहारांसाठी केला जात आहे. या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब म्हणजे वजन मोजमापातील फसवणूक. एका तक्रारीनुसार, दुकानातील वजन काटे बरोबर नव्हते त्यासंदर्भात अनुपम बहुउद्देशीय संस्थेने वजन मोजमाप विभागाकडे तक्रार दाखल केली होती, मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई करण्याऐवजी लाच घेऊन दुकानदाराला मदत केली आहे. 
या गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी आणि फक्त विश्वासार्ह दुकानांमधूनच सोनं खरेदी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सोने खरेदी करताना ग्राहकांनी त्याच्या शुद्धतेची आणि जीएसटी बिलांची सखोल तपासणी करावी. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ज्वेलर्सच्या दुकानांवर कडक कारवाई करावी, अशा मागण्या ग्राहक आणि सामाजिक संस्थांकडून होत आहेत. 
सध्या आयकर विभाग या प्रकरणाची दखल घेत असून, लवकरच अशा दुकानदारांविरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. गैरव्यवहार करणाऱ्या दुकानांची नावे पुढील तपासात उघड होणार असून, प्रशासनाने या प्रकरणात सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक आहे. या गैरव्यवहारामुळे शहरातील सोन्याच्या व्यापारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून, ग्राहकांच्या मनातही शंका निर्माण झाली आहे.
पुढील भागात काही प्रमुख दुकानदारांची नावे आणि त्यांच्या विरोधात असलेले पुरावे प्रसिद्ध केले जातील.
spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Breaking News