Monday, April 28, 2025
Homeबल्लारपूरबल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला
spot_img
spot_img

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला

Ballarpur police busted a motorcycle theft gang

बल्लारपुर: बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आज दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी अजय रामसागर बेन्नी (वय ३७) यांनी बल्लारपुर पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरीची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर करून तपासाला सुरुवात केली. गुन्हा रजि. क्रं. ९०९/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये नोंदवण्यात आला आहे.

मोटार सायकल चोरीच्या घटनेच्या तपासासाठी पोलीसांनी ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून माहिती मिळवली की, चोरी करणारा आरोपी वस्ती परिसरात फिरत आहे. पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करून संशयित आरोपी प्रिन्स ऊर्फ कालु संग्राम बहुरीया (वय २०) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली आणि दोन मोटार सायकल दाखवून दिल्या.

प्रिन्सने सांगितले की, त्याचा मित्र सुरेश ऊर्फ सुर्या कैलाश हरणे (वय २०) यांच्यासह त्यांनी मौजा बामणी आणि आंबेडकर वार्ड बल्लारपुर परिसरात मोटार सायकल चोरी केली होती. त्याच्याच सांगण्यावरून पोलिसांनी पुतीलाल ऊर्फ हनी बाबुलाल निशाद (वय ३०) यालाही ताब्यात घेतले. पुतीलालने मोटार सायकल घेतल्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून तीन मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.

तद्नंतर पोलिसांनी आरोपी प्रिन्स, सुर्या आणि लवकुश ऊर्फ डु निशाद यांच्याशी अधिक चौकशी केली. या चौकशीत आणखी चोरीच्या मोटार सायकल आढळून आल्या. आरोपी तौकीर तौहीद शेख (वय २७) यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मोटार सायकलचे सुटे भाग व चोरीच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.

संपूर्ण कारवाईमध्ये एकूण ९०,००० रुपये किमतीच्या मोटार सायकल आणि १,५०,००० रुपये किमतीचे सुटे भाग व इंजिन मिळून आले. या कारवाईचा आदर्श मार्गदर्शन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

सदर कारवाईत पोलिस निरीक्षक सुनिल गाडे, सपोनि. अंबादास टोपले, पोउपनि. हुसेन शहा यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. मोटार सायकल चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते, पण पोलिसांच्या कार्यवाहीमुळे चोरांच्या टोळ्या उधळण्यात आल्या आहेत.  या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Breaking News