महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची हालचाल लोकसभा निवडणुकीसोबतच सुरू झाली आहे. राज्यभरातील सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत आणि आता सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या घोषणेवर लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख आघड्यांमध्ये जागावाटपाचा अंतर्गत निर्णय जवळपास ठरला आहे. राज्यातील नागरिक आणि सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष निवडणूक आयोगाकडे लागले आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला असून, 280 विधानसभा मतदारसंघ असलेल्या या राज्यात निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी शासन व प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. आयोगाने संकेत दिले आहेत की, दसऱ्यानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
राज्यातील सर्व राजकीय पक्ष प्रचार मोहीम सुरु करत आहेत. लोकांना कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार आवडेल, याचा निर्णय आता मतदानाच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. या पार्श्वभूमीवर आज आपण चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा आढावा घेऊ.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास
1962 मध्ये स्थापन झालेला चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा विदर्भातील महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. आतापर्यंत या मतदारसंघात 13 वेळा निवडणुका झाल्या आहेत. 1962 मध्ये पहिल्या निवडणकीत एक अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. त्यानंतर काँग्रेसने 6 वेळा विजय मिळवला आहे, तर भारतीय जनता पक्षाने 5 वेळा विजय मिळवून आपली राजकीय ताकद दाखवली आहे. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती.
चंद्रपूर विधानसभा निवडणुकीतील विजेते:
1. 2019 – किशोर जोरगेवार (अपक्ष)
2. 2014 – नानाजी शामकुळे (भारतीय जनता पक्ष)
3. 2009 – नानाजी शामकुळे (भारतीय जनता पक्ष)
4. 2004 – सुधीर मुनगंटीवार (भारतीय जनता पक्ष)
5. 1999 – सुधीर मुनगंटीवार (भारतीय जनता पक्ष)
6. 1995 – सुधीर मुनगंटीवार (भारतीय जनता पक्ष)
7. 1990 – श्याम गोपालराव वानखेडे (काँग्रेस)
8. 1985 – श्याम गोपालराव वानखेडे (काँग्रेस)
9. 1980 – नरेशकुमार पुगलिया (काँग्रेस)
10. 1978 – नरेशकुमार पुगलिया (काँग्रेस)
11. 1972 – एकनाथ साल्वे (काँग्रेस)
12. 1967 – एकनाथ साल्वे (काँग्रेस)
13. 1962 – रामचंद्र पोटदुखे (अपक्ष)
2024 चंद्रपूर विधानसभा निवडणुकीतील अपेक्षा
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील 1990 नंतर काँग्रेसला यश मिळवता आलेले नाही. त्याचबरोबर, भारतीय जनता पक्षाने पाच वेळा विजय मिळवून आपली सत्ता कायम राखली आहे. परंतु, 2019 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराने विजय मिळवल्यामुळे मतदारांचा बदलता मूड लक्षात येतो.
किशोर जोरगेवार ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’
सध्या चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची स्थिती ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा होती, परंतु पाणी कुठे मुरले याचा अंदाज आला नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मात्र 22 वर्षांपासून सक्रिय असलेले ब्रिजभूषण पाझारे यांना तिकीट मिळावे, यासाठी आग्रही आहेत. काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार याची अद्याप घोषणा झालेली नाही, त्यामुळे गुलदस्त्यात आहे. येणाऱ्या निवडणुकीत तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. आता जनता कोणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
चंद्रपूर, विधानसभा निवडणूक, 2024, विजेत्यांची यादी, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, अपक्ष, राजकीय विश्लेषण
चंद्रपूर विधानसभा निवडणूक
2024 निवडणूक परिणाम
राजकीय विश्लेषण
किशोर जोरगेवार
भारतीय जनता पार्टी
काँग्रेस
अपक्ष उमेदवार