Friday, February 14, 2025
Homeचंद्रपूरदेवराव भोंगळे उमेदवारी मागे घेऊन राजकीय संन्यास घेणार !
spot_img
spot_img

देवराव भोंगळे उमेदवारी मागे घेऊन राजकीय संन्यास घेणार !

चंद्रपूर: राजुरा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी आपल्या विरोधकांनी केलेल्या निराधार आरोपांवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी स्पष्टपणे विरोधकांना आव्हान केले आहे की, “खबरकट्टा संपादक गोमती पाचबाई, सुरज ठाकरे आणि भूषण फुसे यांनी माझ्यावर लावलेले आरोप निराधार आहेत. जर हे आरोप सत्य असल्याचे सिद्ध झाले, तर मी राजकारणातून संन्यास घेऊन उमेदवारी मागे घेईन.”

भोंगळे यांनी या आरोपांना “राजकीय षडयंत्र” म्हणून संबोधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही विरोधक त्यांच्या यशाची भीती बाळगून त्यांच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करत आहेत. “माझ्या प्रामाणिक कार्यामुळे काहींचा जळफळाट होत आहे. हे आरोप म्हणजे माझ्या राजकीय यशात अडथळा आणण्याचे प्रयत्न आहेत. जर कोणाकडे खरेच पुरावे असतील, तर ते लोकांसमोर आणावेत,” असे भोंगळे यांनी ठणकावून सांगितले.

विरोधकांच्या आरोपांना कठोर शब्दात खंडित करत भोंगळे म्हणाले, “आपल्या आरोपांना कोणताही आधार नाही, हे खुद्द विरोधकांनाही ठाऊक आहे. परंतु, केवळ माझी लोकप्रियता कमी करण्यासाठी, माझ्यावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा हा कट रचला जात आहे.”

तसेच, भोंगळे यांनी आरोपकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपकर्त्यांवर मानहानीचा दावा करण्याचे ठरवले आहे. “हे सर्व आरोप म्हणजे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून केलेली खोटी चिखलफेक आहे. माझ्या प्रतिमेला हानी पोहोचवून मतदारांची दिशाभूल करायची आणि निवडणुकीत आपली बाजू भक्कम करायची, हा यामागचा खरा हेतू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Breaking News