कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी दखल घेण्याची जनतेची मागणी !
चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर जिल्ह्यात रेती-माफीयाचे Reti Mafia जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. अनेक रेती माफीया तर आता पैशासोबत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन समाजात अराजकता माजवित आहे, अशा गुंड प्रवृत्तीच्या रेती माफीयांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व त्यांना मोक्का अंतर्गत तडीपार करण्यात यावे अशी मागणी आता नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.Chichpalli Sand Mafia
चंद्रपूर Chandrapur मुल तालुक्यातील चिचपल्ली परिसरातील असाच एक कुख्यात रेती माफिया मागील काही दिवसांपासून रेती तस्करी मध्ये आपला धाक जमवून व राजकीय पक्षाचे वरदहस्त प्राप्त करून गुंडागर्दी करीत आहे, या रेती तस्करावर यापूर्वी अनेकदा कारवाई झाली असून मधल्या काळात यांचे वर थोड्या फार प्रमाणात लगाम बसला होता. परंतु काही दिवसापासून एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादामुळे रेती व्यवसायात याने आपले पाय घट्ट रोवले असून त्याचेवर “राजकीय” नेत्याचा असलेला आशीर्वाद आता नागरिकांपासून लपलेला राहिलेला नाही तरी या रेती तस्करावर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनी मोक्का अंतर्गत कारवाई करून याला तडीपार करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहे. या रेती तस्कराचे गडचिरोली जिल्ह्यातील आंबेधानोरा व अन्य घाटावरून परराज्यात रेती ची तस्करी सुरू आहे अशी अधिकृत माहिती आहे. गडचिरोली पोलिसांनी मुश्कील आवळा च्या पूर्वी चंद्रपुरातील कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी त्याच्या मुस्क्या आवळायला हव्या.