Friday, February 14, 2025
Homeभद्रावतीघराणेशाहीचा आरोप करत शिवसेनेचा उठाव; काँग्रेसची सत्ता धोक्यात?
spot_img
spot_img

घराणेशाहीचा आरोप करत शिवसेनेचा उठाव; काँग्रेसची सत्ता धोक्यात?

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हा प्रमुख आणि अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे Mukesh Jiwtode यांनी शिवसेनेच्या एबी फॉर्मविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जीवतोडे यांनी आरोप केला आहे की, खासदार प्रतिभा धानोरकर Pratibha Dhanorkar यांनी आपल्या आर्थिक ताकदीचा वापर करून आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांशी संगनमत करून आपला एबी फॉर्म परत घेतला. महाविकास आघाडीत वरोरा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्यानंतर मुकेश जीवतोडे यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे.Dynasty Politics, Shiv Sena Revolt, Congress in Trouble, Mukesh Jiwtode, Pratibha Dhanorkar

काँग्रेस पक्षाने वरोरा विधानसभा मतदारसंघात खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सख्खे बंधू प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिली आहे, ज्यामुळे जीवतोडे यांनी नाराज होऊन काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला. जीवतोडे यांनी विशेषत: यामध्ये प्रतिभा धानोरकर यांनी स्थानिक नेत्यांचा अपमान करत आपल्या बंधूला तिकीट मिळवण्यासाठी पक्षावर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. “शिवसेना चंद्रपूर जिल्ह्यात जिवंत ठेवायची असेल तर विधानसभा निवडणुकीत लढणं आणि विजय मिळवणं अत्यावश्यक आहे. आम्ही ही लढाई बंड नाही, तर एक उठाव मानतोय,” असे वक्तव्य जीवतोडे यांनी केले आहे.In Warora Assembly constituency, Shiv Sena leader Mukesh Jiwtode has accused Congress MP Pratibha Dhanorkar of dynasty politics, leading him to contest independently. Could this revolt put Congress’s hold at risk?

Shiv Sena, Congress, Warora Assembly, Mukesh Jiwtode, Pratibha Dhanorkar, Dynasty Politics, Maharashtra Elections

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Breaking News