Monday, April 28, 2025
Homeक्राईमहाजी सरवर हत्या प्रकरणातील १४ आरोपींवर 'मोक्का'ची कारवाई, एक अद्याप फरार!
spot_img
spot_img

हाजी सरवर हत्या प्रकरणातील १४ आरोपींवर ‘मोक्का’ची कारवाई, एक अद्याप फरार!

चंद्रपुरातील कुख्यात गुंड हाजी सरवर ऊर्फ शेख हाजी बाबा शेख सरवर Haji server Sheikh  यांच्या हत्येप्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या १४ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Chandrapur crime चंद्रपूर जिल्ह्यातील मोक्कांतर्गत झालेली ही यंदाची पहिली कारवाई आहे. आरोपींपैकी १३ जणांना वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात आले आहे, तर एक आरोपी अजूनही फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.macoca

१२ ऑगस्ट रोजी घडलेल्या या हत्येप्रकरणात प्रमोद मधुकर वेळोकर ऊर्फ राजू भगवान वेरूळकर ऊर्फ समीर शेख सरवर, नीलेश ऊर्फ पिंटू नामदेवराव ढगे, श्रीकांत अशोक कदम, प्रशांत ऊर्फ परसी राजेंद्र मालवेनी, राजेश रमेश मुलकलवार, सुरेंद्रकुमार यादव, अक्षय रत्ने, मोहसिन शेख, अभिजित ऊर्फ पवन कटारे, शेख नसिफ शेख रशीद, अखिल जमिल कुरेशी, नूर अहमद कुरेशी, सय्यद अबरार यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आले आहेत. मात्र, किशोर चानोरे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही, आणि तो मागील अडीच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांकडून विशेष पथक नेमण्यात आले आहे.

 

या प्रकरणाचा तपास करताना चंद्रपूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्हेगारीच्या या प्रकारावर कठोर पावले उचलली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी या १४ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यामार्फत नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे सादर केला होता. मंजुरी मिळाल्यानंतर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोक्का कायद्यानुसार आरोपींना कठोर शिक्षा होऊ शकते, ज्यामुळे अशा संघटित गुन्हेगारीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

या हत्येप्रकरणाचा तपास आता अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी तपासाच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, या गुन्ह्यातील प्रत्येक आरोपीवर सखोल चौकशी केली जाईल. हाजी सरवरच्या हत्येच्या घटनेत सामील असलेल्या आरोपींना न्यायालयासमोर सादर करण्याच्या उद्देशाने तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

 

पोलिसांच्या तपासानुसार हाजी सरवरची हत्या १२ ऑगस्ट रोजी झाली होती. त्याच्या विरोधात कार्यरत असलेल्या गटाने ही हत्या केल्याचा संशय आहे. या हत्येने चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ माजली होती. यामुळे पोलिसांनी लगेचच कार्यवाही करत या आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१), १०९ (१), १८९ (२), १८९ (४), १९१ (२), १९१ (३), १९० अन्वये गुन्हा नोंदवला गेला आहे. तत्परता दाखवून पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली असली तरी चौदावा आरोपी किशोर चानोरे अजूनही फरार असून त्याला शोधण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.

आरोपींच्या या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी ‘मोक्का’ अंतर्गत कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणातील कारवाईमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Breaking News