Friday, February 14, 2025
HomeChandrapurनोव्हेंबरचा प्रत्येक दिवस चंद्रपूरकरांसाठी विषारी!
spot_img
spot_img

नोव्हेंबरचा प्रत्येक दिवस चंद्रपूरकरांसाठी विषारी!

चंद्रपूरचा श्वास कोंडला; सरकार आणि प्रशासन गाढ झोपेत!

चंद्रपूरच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. हिवाळ्यातील थंड वातावरण आणि औद्योगिक धुळीच्या माऱ्यामुळे संपूर्ण शहराचा श्वास कोंडल्यासारखा झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात शहरातील हवा एकदाही शुद्ध नव्हती. 30 दिवसांपैकी 29 दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 101-200 च्या श्रेणीत म्हणजेच ‘सर्वसाधारण प्रदूषित’ राहिला, तर एक दिवस ‘गंभीर प्रदूषण’ नोंदवले गेले. ही स्थिती आरोग्यासाठी प्राणघातक आहे, पण तरीही प्रशासन मात्र निष्क्रिय आहे.  Chandrapur faces worsening pollution, with the AQI consistently in the ‘hazardous’ range. The proposed expansion of Lloyds Metals adds to the environmental threat. Swrajyarakshak Social Organization urges the government to take immediate action.

 

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून उडणाऱ्या धुळीने शहरातील हवेची गुणवत्ता अधिकच खराब केली आहे. वाहनांच्या संख्येत होणारी वाढ, रस्त्यांवरील धूळ, आणि कचऱ्याच्या ज्वलनामुळेही प्रदूषणाचा स्तर वाढत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष न देता केवळ आकडेवारी गोळा करणे आणि अहवाल सादर करणे हेच काम चालवले आहे. मात्र, या निष्क्रियतेमुळे शहरातील लोकांना विषारी हवेचा त्रास सहन करावा लागत आहे.

 

या सगळ्यात, ल्लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या प्रस्तावित विस्ताराने चंद्रपूरकरांच्या चिंतेत अधिकच भर घातली आहे. स्वराज्यरक्षक सामाजिक संस्थेने या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. संस्थेने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात या विस्तारामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे गंभीर परिणाम मांडले आहेत. मंत्रालयाने या पत्राची दखल घेत अहवाल मागवला आहे. मात्र, अहवाल मागवून प्रश्न सुटणार नाहीत. औद्योगिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि अशा प्रकल्पांना परवानगी देण्यापूर्वी स्थानिक जनतेच्या आरोग्याचे संरक्षण करणाऱ्या कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

 

चंद्रपूरमधील हवा दिवसेंदिवस विषारी होत चालली आहे. प्रशासनाने झाडे लावणे, सार्वजनिक वाहतुकीचा प्रचार करणे, आणि औद्योगिक उत्सर्जनावर कठोर नियंत्रण ठेवणे यांसारखे उपाय योजायला हवे. नागरिकांनीही जबाबदारी घेतली पाहिजे आणि प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला पाहिजे.

 

जर वेळेत पावले उचलली नाहीत, तर चंद्रपूरसारखी शहरे प्रदूषणाच्या विळख्यात अडकून भविष्यातील पिढ्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या भोगाव्या लागतील. जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला, तर प्रशासनाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. जनता पर्यावरण रक्षणासाठी सज्ज आहे, आणि आता सरकारलाही या लढ्यात सहभागी व्हावे लागेल.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Breaking News