सह दुय्यम निबंधक माहोरे यांचा चंद्रपूरमध्ये नियमबाह्य कारभार; दलालांच्या माध्यमातून लाखोंचा गैरव्यवहार
चंद्रपूर: सह दुय्यम निबंधक वर्ग दोन म्हणून नियुक्त असलेले माहोरे यांची बदली वरोरा येथे झाली असली तरी ते प्रतिनियुक्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूरमध्येच कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नियमबाह्य कारभार करत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले आहे.
माहोरे यांनी चंद्रपूर शहरातील तूकूम येथील महेश नगर भागातील ९२/२ या नो डेव्हलपमेंट झोन असलेल्या जमिनींची विक्री केली आहे. नियमानुसार विकास प्रतिबंधित क्षेत्रातील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर बंदी असताना त्यांनी कायद्याला हरताळ फासत ही विक्री केली. यामुळे प्रशासकीय नियम धाब्यावर बसवून शहराच्या नियोजनात गोंधळ निर्माण झाला आहे.
याशिवाय, दस्तनोंदणी प्रक्रियेतही त्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले आहेत. प्रत्येक रजिस्ट्री मागे त्यांनी २००० रुपये या प्रमाणे दलालांच्या माध्यमातून घेतले जाते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असून, सामान्य नागरिकांची पिळवणूक करण्यासाठी दलालांना संगनमताने मोकळे रान देण्यात आले.
सह दुय्यम निबंधक वर्ग दोन या कार्यालयात अधिकृत परवानाधारक दस्तलेखक केवळ सात जण आहेत. मात्र, प्रत्यक्षात कार्यालय परिसरात १० ते १२ दलाल सक्रिय असून, हे सर्व माहोरे यांच्या संगनमतानेच काम करत आहेत. या दलालांच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर अवैध उत्पन्न मिळवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली
विशेष म्हणजे, बदली झाल्यानंतरही माहोरे यांची प्रतिनियुक्तीवर चंद्रपूरमध्येच नियुक्ती का करण्यात आली, यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय एवढा मोठा गैरकारभार होणे शक्य नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून माहोरे यांच्यासह त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कारवाई करावी,