Monday, April 28, 2025
HomeChandrapurताडोब्यातील रिसॉर्टमध्ये तरुणीवर मादक पदार्थ देऊन अत्याचार ; तिघांविरोधात गुन्हा
spot_img
spot_img

ताडोब्यातील रिसॉर्टमध्ये तरुणीवर मादक पदार्थ देऊन अत्याचार ; तिघांविरोधात गुन्हा

चंद्रपूर | येथील एका तरुणीला कामाच्या बहाण्याने ताडोब्यातील वाइल्डलाइफ रिसॉर्टमध्ये नेऊन जबरदस्तीने मादक पदार्थ देत बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून तिघांविरोधात बलात्कार, धमकी आणि अमली पदार्थ वापरण्याचे गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

१८ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्तार शाह नामक इसमाने आपल्या पत्नीला पीडितेकडे काही काम आहे असे सांगत, पीडितेला घरातून बोलावून घेतले. मात्र, पीडितेला घरी नेण्याऐवजी तो तिला थेट ‘ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्ट’मध्ये घेऊन गेला. तेथे एका खोलीत तिला अडवण्यात आले. नंतर, रिसॉर्टमधील वेटरने आणलेल्या दोन कॉफींपैकी एक कॉफी पीडितेला दिली. त्या कॉफीत मादक पदार्थ मिसळले होते. ती कॉफी प्याल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

तक्रारीत म्हटले आहे की, या घटनेनंतर मुख्तार शाहसह नुरानी अहमद गुलाम नबी आणि मुख्तार गुलाम नबी या दोघांनी पीडितेला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी पीडितेने ही घटना कोणालाही सांगितली नव्हती. मात्र, सातत्याने दिल्या जाणाऱ्या धमक्यांमुळे पीडितेने अखेर आपल्या पालकांना ही घटना सांगण्याचे धाडस केले. त्यानंतर तिने रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.या तक्रारीनंतर रामनगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता, २०२३ अंतर्गत कलम ६४ (बलात्कार), ११५(२) (जीवाला धोका), ३५१(४) (मादक पदार्थांचा वापर करून गुन्हा), आणि ३(५) (गुन्ह्याची धमकी) अशा गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनंतर लगेचच गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाने चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Breaking News